बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचारावेळी शहरात जातीय सलोख्याचे चित्र पहायला मिळाले. हिंसाचारग्रस्त डीजे हळ्ळी परिसरातील सुमारे १०० मुस्लिम तरुणांनी हिंदू मंदिराच्या बाहेर मानवी साखळी तयार केली जेणेकरून मंदिरावर हल्ला होऊ नये. हिंसाचारावरून जमावाने डीजे हळ्ळी पोलीस ठाण्यावर हल्ला केला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.
वास्तविक, डीजे हळ्ळीजवळील शामपूर रोडयेथे हनुमान मंदिर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दुचाकी मोटार सायकलवरून मंदिराजवळ आले आणि तेथून पोलिस ठाण्याच्या दिशेने गेले. त्यांच्यामागे एक जमाव आला. त्यादरम्यान, काही मुस्लिम तरुणांनी अंदाज लावला की परत जाताना ते मंदिरात जाऊन मंदिराची तोड फोड करू शकतात.
यावेळी मंदिराच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या खालिद या मुस्लिम युवकाने म्हंटले की जेव्हा हिंसा करणारे लोक मंदिराजवळ आले तेव्हा आम्हाला वाटलं की आता ते दगड चालवतील मंदिराची तोडफोड करतील. त्यामुळे हिंसाचारात ही वाढ झाली असती. आम्ही त्यांना ताबडतोब थांबवले. दरम्यान परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकही आले. प्रकरण टळलं. परंतु आम्हाला वाटले की परतल्यावर ते देवळावर हल्ला करतील. मग आम्ही मंदिराला सुरक्षा देण्याची योजना आखली. हिंसाचारादरम्यान बंधुता आणि सद्भावनाची उदाहरणे ठेवून 100 हून अधिक मुस्लिम तरुणांनी मंदिराभोवती मानव साखळी तयार केली. इतकेच नाही तर मंदिरात तोडफोड होऊ नये म्हणून ते सकाळी 11.30 ते दुपारी 1 या वेळेत मंदिरासमोरील ठिकाणी उभे राहिले.