बेंगळूर /प्रतिनिधी
बेंगळूरच्या मडीवाला येथील कर्नाटक पोलिसांच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेतील (एफएसएल) स्टेनोग्राफर आणि सिटी आर्म्ड रिझर्व्ह (सीएआर) पोलिस शिपायाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बुधवारी लॅब सील केली आहे.
सिटी पोलिसांच्या माहितीनुसार, बृहत बेंगळूर महानगर पालिकेचे (बीबीएमपी) आरोग्य अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांनी एफएसएल लॅब आणि आसपासचा अन्य परिसर निर्जंतुकीकरण केला आहे.