बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी गुरुवारी शहरातील ड्रग रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला व्यक्ती रॉबिन मूळचा केरळचा असून ड्रग रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याने सीसीबी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
सीसीबी पोलिसांनी मंगळवारीही डार्कनेटद्वारे ड्रग्स खरेदी करणाऱ्या दोन ड्रग पेडलरना अटक केली होती. पोलिसांनी सुमारे १ हजार एलएसडी पट्ट्या जप्त केल्या आहेत.
दरम्यान ते डार्कनेटद्वारे ड्रगनेट विकत घेत होते आणि नेदरलँड्समधून त्याने एलएसडी ड्रग खरेदी केले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सर्व ड्रग जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.