बेंगळूर/प्रतिनिधी
मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनने (एमएएचई) बुधवारी कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील मृत्यू पावले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफ केल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. तसेच उर्वरित अभ्यासानुसार सर्व कार्यक्रमांमध्ये शिष्यवृत्ती दिली जाईल असे एमएएचई प्रशासनाने सांगितले.
“या निर्णयाने; आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांनी दुर्दैवाने कुटुंबातील एकमेव कमाई करणारा सदस्य गमावला आणि या साथीच्या रोगाचा परिणाम सहन केला. एमएएचईला आशा आहे की विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होतील, असे एमएएचईचे कुलगुरू डॉ. एम. व्यंकटेश म्हणाले.