बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात वाढती कोरोनाची संख्या डोकेदुखी बनली आहे. राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाने शहरात ४ हजारापर्यंत मजल मारली आहे. रुग्णवाढीमुळे बीबीएमपी प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे बीबीएमपीने लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच कोरोना प्रसार रोखण्यासाठी नवीन निर्बंधही लागू केले आहेत.
बेंगळूरमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने कर्नाटक सरकारने बुधवारी शहर हद्दीतील सीआरपीसीच्या कलम १४४ अंतर्गत अधिक निर्बंध घातले आहेत. आदेशानुसार सरकारने बेंगळूर शहर हद्दीतील अपार्टमेंटस् व निवासी संकुलांमध्ये असणारे जलतरण तलाव, व्यायामशाळा, पार्टी हॉल इ. सुरु ठेवण्यास बंदी घातली आहे.