बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा वेग वाढला असून राज्याची राजधानी असलेल्या बेंगळूर शहरी जिल्ह्यातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहेत. शहरात बेडची कमतरता भासत आहे. यातच खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णाला उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने पोलिसांनी या खासगी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्टिस रुग्णालयाविरोधात बोमनहळ्ळी आरोग्य अधिकारी डॉ. नागेंद्र यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्याने खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान रुग्णालय अधिकारी यांनी रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यास नकार दिल्यानंतर उत्पल सिन्हा यांचा रुग्णालयाच्या आवारात मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. कोविड -१९ चे रुग्ण असल्याने त्यांना श्वास घेताना गंभीर त्रास होत होता, यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.