बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगर पालिकेचे (बीबीएमपी) मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले. गुप्ता यांनी विषाणूच्या प्रसारासंदर्भात आढावा बैठक घेतांना सांगितले की, “शहरात कोविड -१९ प्रकरणे वाढत आहेत, म्हणून झोन स्तरावर कोविड केअर सेंटर आवश्यकतेनुसार स्थापन करणे आवश्यक आहे. ५० टक्के बेड राखीव ठेवणे आवश्यक आहे. ताबडतोब खासगी रुग्णालयात ५० टक्के बेड आरक्षति करावेत असे म्हंटले आहे.