बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगर पालीके (बीबीएमपी) च्या केंद्रीयकृत यंत्रणेमार्फत कोरोना बेडच्या वाटपात घोळ केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने आणखी दोन जणांना अटक केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान सीसीबीला माहिती मिळताच बेड वाटपात घोटाळा करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. ते दोघे बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकाकडे पैशाची मागणी करत आणि मगच बेड उपलब्ध करून देत असतं.
कारवाईनंतर सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे यशवंत कुमार एम. (वय २१) आणि वरुण एस. (वय २०) अशी आहेत. हे बीबीएमपी दक्षिण विभागाच्या वाॅर रूमला काम करत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान वरुण हा बीबीएमपी दक्षिण झोन वॉर रूममध्ये काम करत असताना त्याचा मित्र यशवंत याच्याशी पेशंटची संख्या पाहून बेड बुकिंगसाठी पैशाची मागणी करण्यासाठी त्याच्याकडे आलेल्या रूग्णांशी संपर्क साधायचा,” असे ते म्हणाले. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
याच प्रकरणात बोम्मनहळ्ळीचे आमदार सतीश रेड्डी यांच्या वैयक्तिक सहाय्यकाशी परिचित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती सीसीबीने मंगळवारी दिली होती. या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सीसीबीला या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सिस्टममध्ये अनियमिततेचे आरोप बेंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्य आणि तीन आमदारांनी केले होते.