बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी बेंगळूर येथील आनंदराव सर्कल जवळील नव्या नामांतरित उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. उड्डाणपुलाचे नाव क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा असे आहे. संगोळ्ळी रायण्णा हे १९ व्या शतकातील सैन्य प्रमुख होते.
गांधीनगर प्रभाग हद्दीतील हा उड्डाणपूल पश्चिम बेंगळूरला व्यवसायासाठी मध्यवर्ती जिल्ह्याशी जोडते. बेंगळूरच्या सिटी रेल्वे स्थानकाचे नाव ही क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा असे आहे.