बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर येथे केंद्रीय गुन्हे शाखा (सीसीबी) पोलिसांनी वाढत्या अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर घटनांची पाहणी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन झाडाझडती घेतली. दरम्यान, योग्य कागदपत्रांशिवाय राहणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी परदेशी नागरिक रहात असलेल्या घरांमध्ये सीसीबी पोलिसांनी तपासणी सुरु केली आहे.
दरम्यान, सीसीबी पोलिसांनी याआधीही बेकायदेशीर राहणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली आहे. आता पुन्हा देशात होत असलेल्या अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सीसीबी पोलिसांनी शहरात योग्य कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिली आहे.
तसेच सह पोलीस आयुक्त पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईसाठी तब्बल ६ एसीपी, २० पोलीस निरीक्षक आणि १०० हेड कॉन्स्टेबल, पोलीस हवालदार तैनात करण्यात आले आहेत.