प्रतिनिधी /बेळगाव :
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामध्ये नागरिकांपर्यंत अत्यावश्यक सेवा सुविधा पोहोचविण्यामध्ये रेल्वेने पुढाकार घेतला आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-जयपूर या मार्गावर पार्सल टेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे तुमकूर, हुबळी, बेळगाव मार्गे धावणार आहे. यामुळे एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पार्सल पोहोचविणे सोपे जाणार आहे.
रेल्वे क्रमांक 00623 ही रेल्वे दि. 16 व 23 रोजी बेंगळूर येथून धावणार आहे. तर रेल्वे क्र. 00624 ही रेल्वे दि. 18 व 25 रोजी जयपूर येथून धावणार आहे. एकूण दोन फेऱया या एक्स्प्रेसच्या असणार आहेत. या रेल्वेला यशवंतपूर, तुमकूर, अरसिकेरे, दावणगेरी, हुबळी, बेळगाव, मिरज, सातारा, पुणे, वसई रोड, सूरत, वडोदरा, गोध्रा, रत्लम, चंदेरिया व अजमेर असे थांबे असणार आहेत.
नैर्त्रुत्य रेल्वेचे हुबळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मलकारे यांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. ग्राहकांनी रेल्वेच्या फोन क्रमांकावर संपर्क साधून रेल्वे पार्सल बुकिंगची माहिती घ्यावयाची आहे. ग्राहकांना औषधे, तांदूळ, गहू, भाजीपाला, दूध, फळे, मासे, अंडी यासारखे साहित्य पार्सल करणे सहज शक्मय होणार आहे.