बेंगळूर /प्रतिनिधी
बेंगळूर महानगरपालिका (बीबीएमपी) प्रांतातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी, गेल्या एका आठवड्यात घेतलेल्या जलद प्रतिजैविक चाचणीपैकी ९.४१ टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कंटेनमेंट झोनमधील प्राथमिक व दुय्यम संपर्कांची विशेष तपासणी केली जात असल्याचे बीबीएमपीचे आयुक्त एम. मंजुनाथ प्रसाद यांनी सांगितले. तसेच सारी आणि आयएलआय पीडितांनाची चौकशी केली जत असल्याचे म्हंटले आहे.
आठवड्यातील तपासणीची संख्या दररोज 10 हजार वरून 10 दिवसांपर्यंत 20 हजार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बीबीएमपी टीम गर्भवती महिलांसह एसएआरआय आणि आयएलआयच्या रूग्णांची ओळख पटविण्यासाठी 10 दिवसांत एकदा डोर-टू-डोअर सर्वेक्षण करणार असल्याचे आयुक्तांनी म्हंटले आहे.
रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात कर्नाटकची स्थिती चांगली आहे. गेल्या आठवड्यात, ५० टक्के पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ११. ३७ टक्के तर बेंगळूर शहरात २०.७५ टक्क्यांनी वाढले आहे.