बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात अमली पदार्थांची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. सँडलवुड ड्रग्स प्रकरणावरून हे निष्पन्न होते. ड्रग्ज पार्कर्णात अनेक कलाकार सहभागी आहेत. या प्रकरणी सीसीबी पोलीस तपास करत आहे. दरम्यान सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी गुरुवारी बिटकॉईन्सचा वापर करून डार्कनेटच्या माध्यमातून मादक पदार्थांची खरेदी केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक केली. यावेळी त्याच्याकडून ५०० ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार डार्कनेटद्वारे ड्रग पेडलिंगचे आणखी एक रॅकेट उघडकीस आले आणि बिटकॉईन्सचा वापर करून ड्रग खरेदी करणारा आरोपी सुजयला अटक केली त्याच्याकडून ५०० ग्रॅम हायड्रो गांजा जप्त केला, अशी माहिती दिली.
२ नोव्हेंबरला सीसीबी पोलिसांनी दहा ड्रग पेडलरांकडून ९० लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केली असून आठ स्वतंत्र गुन्हे दाखल केले. गेल्या आठवड्यात आठ ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि एका नायजेरियन नागरिकांसह दहा ड्रग पेडलर्सना अटक करण्यात आली आहे.