बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मधील डी. जे. हळ्ळी हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी संपत राज हा फरार आहे. एएनआयने दहशतवादविरोधी कक्षाने बृह बेंगळूर महानगर पालिकेचा माजी महापौर आणि कॉंग्रेस नेता संपतराज याला दहशतवादविरोधी कक्षाने नोटीस पाठविली असल्याची माहिती दिली
डी. जे. हळ्ळी प्रभागातील माजी नगरसेवक असलेला संपत राज यांच्यावर ११ ऑगस्ट रोजी बेंगळूर दंगलीच्या वेळी कावळ बायरसंद्रा येथे आमदार आर अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे घर जाळण्यासाठी जमावाला भडकवण्याचा आरोप आहे.
ऑगस्टमध्ये राजची प्रथम चौकशी केली गेली. पण जेव्हा पोलिसांनी त्याला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पण संपतराज कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संपत राजला डिस्चार्ज देण्यापूर्वी माहिती देण्यासाठी रुग्णालयात नोटीस बजावली. मात्र संपतराज ३० ऑक्टोबरला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यांनतर गायब झाला. केंद्रीय गुन्हे शाखा (सीसीबी) चे विशेष पथक त्याचा शोध घेण्यासाठी शहर व आसपासच्या जिल्ह्यात प्रयत्न करीत आहेत.