सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : आज होणार चौकशी
प्रतिनिधी/ बेंगळूर
अमली पदार्थ प्रकरणी दररोज नवी माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ नियंत्रण पथका (एनसीबी) ने रविवारी ड्रग्ज विक्री आणि खरेदीच्या संशयावरून बेंगळूर महानगरपालिकेच्या एका नगरसेवकाच्या पुत्राला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे. शहरातील महालक्ष्मी लेआऊटचे नगरसेवक केशवमूर्ती यांचा पुत्र यशस याला सोमवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्याची सूचना केली आहे. तसेच चौकशीसाठी हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिसीद्वारे दिला आहे.
सुशांतसिंह रजपूत आत्महत्या प्रकरणासंबंधी एनसीबीने राज्यात चौकशी सुरू केली आहे. रियाच्या चौकशीनंतर ड्रगचे जाळे मोठे असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सदर प्रकरण एनसीबीकडे सोपविल्यानंतर एनसीबीने अब्दुल रेहमान याला अटक केली. दरम्यान, त्याची चौकशी केली असता या प्रकरणात बेंगळूरच्या नगरसेवकच्या पुत्राचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सोमवारी यशस याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी मुंबई एनसीबी अधिकाऱयांसमोर त्याची चौकशी होणार आहे.