बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दोन विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान राजराजेश्वरी नगर (आर.आर. नगर) पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सशस्त्र सैन्य दलाच्या दोन तुकड्या शुक्रवारी बेंगळूर येथे दाखल झाल्या.
डीसीपी (पश्चिम) संजीव एम. पाटील यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आगामी आर. आर. नगर पोटनिवडणुकीसाठी शहरात दाखल झाले आहे. सीआयएसएफची तुकडी पश्चिम विभागात तैनात करण्यात आली आहे.
डीसीपी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सीआयएसएफची एक तुकडी बेंगळूरची असून आणखी एक तुकडी तमिळनाडू, तेलंगणा आणि म्हैसूर येथील आहे.
बेंगळूरमधील आर. आर. नगर मतदारसंघ आणि तुमकूर जिल्ह्यातील सिरा मतदार संघाची ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये जद (एस) चे आमदार बी. सत्यनारायण यांच्या निधनानंतर सिरामधील जागा रिक्त होती, तर राजराजेश्वरी नगर येथील काँग्रेस आमदार अपात्र ठरल्याने ही जागा रिक्त होती. आता या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.