बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर पोलिसांना सात पोर्टेबल केबिन मिळाल्या आहेत. या पोर्टेबल केबिनमध्ये मीटिंग एरियासह पूर्ण, चार बंकर बेड्स आणि वॉशरूम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. दरम्यान शहरातील मोक्याच्या ठिकाणी या पोर्टेबल केबिन ठेवल्या आहेत.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रदान केलेल्या केबिनचे उद्घाटन शुक्रवारी शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी केले. पोलीस कर्मचार्यांचे हवामानापासून संरक्षण मिळावे, कामकाज सुरळीत व सक्षम व्हावे आणि नागरिकांना सहज प्रवेश मिळावे या उद्देशाने शहर पोलिसांना या केबिन दान करण्यात आल्या आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
केबिनमध्ये ऊर्जा-कार्यक्षम एलईडी दिवे, छत पंखे आणि इलेक्ट्रिक सॉकेट्स दिले आहेत. वातानुकूलनसाठी तरतूदही करण्यात आली आहे. ३०० लिटर क्षमतेच्या ओव्हरहेड पाण्याच्या टाकीसह, या केबिनमध्ये स्वयंपाकघरही उपलब्ध आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.