बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य कोविड टास्क फोर्सने बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. प्रत्येक मतदार संघात १०० बेड्चे रुग्णालय उभारण्यासाठी जमिनीची माहिती घेतील. दरम्यन प्रत्येक विधानसभा मतदार संघात राज्य सरकार १०० बेडचे रूग्णालय उभारण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. यासाठी रिकाम्या जागा शोधण्यासाठी टास्क फोर्स काम करत आहे.
दरम्यान, टास्क फोर्सची अगोदर बैठक झाली तेव्हा त्याचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी बेंगळूरच्या सर्व २८ मतदारसंघात १०० सुविधायुक्त रुग्णालय उभारण्याच्या कल्पनेस सहमती दर्शविली. परंतु सरकारला यासाठी जमीन सापडली नाही.
ते म्हणाले, “आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आमच्याकडे बेंगळूरमध्ये अनके अडचणींचा सामना करावा लागला आहे.” “म्हणून, आम्ही रुग्णालयांच्या बांधकामासाठी रिक्त योग्य जागा शोधण्यासाठी बीबीएमपी चीफ कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.”
आयुष्मान भारत किंवा सुवर्णा आरोग्य सुरक्षा ट्रस्ट (एसएएसटी) अंतर्गत सूचीबद्ध नसलेल्या आजारांवर दर्जेदार व प्रभावी उपचार मिळावेत यासाठी दुसऱ्या स्तरावरील रुग्णालये सुधारण्याचेही सरकारचे लक्ष्य आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. “या प्रकल्पासाठी बरीच जागा हवी आहे,” असे उपमुख्यमंत्री नारायण म्हणाले. “समिती काही आठवड्यांत आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर शासन निर्णय घेईल.” असे ते म्हणाले.