बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड फिल्म इंडस्ट्रीत होणारे अंमली पदार्थांचे सेवन आणि देवाण-घेवाण याविषयीच्या प्रकरणाची चौकशी करणार्या सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) शनिवारी आफ्रिकेतील एका व्यक्तीला चित्रपट सृष्टीतील व्यक्तिंना ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
आफ्रिकेचा मूळ रहिवासी असलेल्या लूम पेपर सांबा याच्यावर रवी आणि इतर चित्रपटातील व्यक्तींना ड्रग्स पुरविल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चित्रपट अभिनेत्री रागिनी द्विवेदीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रागिनीला अटक करण्यात आली होती, तर तिचा आरोपी मित्र आरटीओ लिपिक रविशंकरला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रिअल इस्टेट उद्योगपती राहुल शेट्टीही पोलिसांच्या ताब्यात आहे. नवी दिल्लीहून पार्टीची योजना आखणार्या वीरन खन्ना नावाच्या व्यक्तीलाही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.