बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये कोरोनामुक्त झालेली महिला पुन्हा कोरोना संक्रमित झाली आहे. तिने जुलैमध्ये कोरोनावर मत केली होती. बरे झालेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह होण्याची ही पहिली घटना आहे. पुन्हा संसर्गाच्या या भयावह प्रकरणाबद्दल फोर्टिस हॉस्पिटलने म्हंटले आहे की २४ वर्षीय महिलेला जुलैमध्ये कोरोना झाला होता. काही दिवसानंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. नंतर पुन्हा कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हॉस्पिटल फिजिशियनच्या म्हणण्यानुसार, संसर्गानंतर काही आठवड्यांनंतर त्यांच्यात म्हणावी तितकी रोग प्रतिकार शक्ती तयार झाली नसल्याने पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे.
महिन्याभरात आयजीजी अँटीबॉडीजचे निर्मूलन होण्याची आणखी एक शक्यता आहे, ज्यामुळे विषाणू शरीरात पुन्हा प्रवेश करते. विषाणूच्या पुन्हा संसर्गाच्या प्रकारामुळे डॉक्टर चिंताग्रस्त झाले आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.