बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मधील बापूजी नगर येथे असलेल्या केमिकल फॅक्टरीत मंगळवारी भीषण आग लागली. घटनास्थळी तीन अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होत आग वीजविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आणखी दोन गाड्या घटनास्थळी येत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस उपायुक्त (पश्चिम) संजीव एम. पाटील यांनी अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज सकाळी आग लागल्यावर कारखान्यात तब्बल चार कामगार होते. ते सर्वजण सुखरूप बाहेर आले आहेत, असे ते म्हणाले. आगीमागील कारण अद्याप समजू शकले नाही. बापूजी नगरातील पहिला मेन रोडवरील महादेव शाळेजवळ हा कारखाना आहे.