बेंगळूर/ प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना राजधानीत लॉकडाऊन वाढविणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. पण ब्रुह बेंगळूर महानगर पालीकेचे (बीबीएमपी) आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी मंगळवारी शहरात लॉकडाउन उठवला गेला असतानाही बेंगळूरमधील विविध बाजारपेठा बंद ठेवण्यात येतील, असे जाहीर केले आहे.
यामध्ये केआर मार्केट, यशवंतथ मार्केट, चिककेट बंद तर एसपी रोड काही दिवस बंद राहणार असल्याचे मंजुनाथ प्रसाद यांनी सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मंगळवारी बेंगळूरसाठी लॉकडाउन वाढविण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे.