बेंगळूर /प्रतिनिधी
बृहत बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) बेंगळूर दक्षिणमधील कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी बेड न पुरविल्याबद्दल १९ खासगी रुग्णालयांचे परवाने तात्पुरते रद्द केले आहेत.
बीबीएमपी अधिकार्यांच्या माहितीनुसार, शासकीय आदेशानुसार शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना कोविड -१९ उपचारासाठी त्यांच्या रुग्णालयांमध्ये ५० टक्के बेड आरक्षित करण्यास सांगितले आहे. परंतु १९ खासगी रुग्णालयांनी बेड आरक्षित केलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे बीबीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील परवाने रद्द केलेली रुग्णालये
अनुग्रह विट्ठल रुग्णालय, विनायक रुग्णालय, प्रशांत रुग्णालय आणि बसवणगुडी येथील राधा कृष्ण रुग्णालय. गुरूश्री हॉस्पिटल, काळभैरव हॉस्पिटल, पद्मश्री हॉस्पिटल आणि विजयनगरातील मारुती हॉस्पिटल. प्रोमेड हॉस्पिटल, एन.यू. हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल, सेवाक्षेत्र हॉस्पिटल आणि पद्मनाभनगरमधील उद्धव हॉस्पिटल. गंगोत्री हॉस्पिटल, अकुरा हॉस्पिटल आणि बीटीएम लेआऊटमधील कारंथ हॉस्पिटल. एचसीजी हॉस्पिटल, ट्रिनिटी हॉस्पिटल आणि चिकपेटमधील मैया हॉस्पिटल.