बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) शहरभरातील २०८ flexes/hoardingsभागातील २९७l बेकायदा फ्लेक्स, होर्डिंग्ज हटविली आहेत. दरम्यान बीएमपी कमिशनर एन . मंजुनाथ प्रसाद यांनी झोनल संयुक्त आयुक्त आणि विभागीय अभियंता यांना जाहिरातींसाठी वापरल्या जाणार्या लोखंडी रचनांसह बेकायदेशीर होर्डिंग्जचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी केले होते.
आयुक्त प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना उपविभाग आणि प्रभाग स्तरावर अशा व्यावसायिक होर्डिंगची यादी तयार करून तसेच कर व दंड तसेच दंड व एफआयआर नोंदवून लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांच्या निर्देशानंतर नागरी संस्थेने बेंगळूर शहरातील आठ विभागातील अवैध फ्लेक्स, होर्डिंग्ज हटविली आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नोव्हेंबर २०१९ मध्ये कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकारला बेकायदा जाहिराती, फ्लेक्स, होर्डिंग्जविरोधात कारवाई करण्यासाठी शहर महामंडळांना निर्देश जारी करण्याचे निर्देश दिले होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक नगरपालिका (केएमसी) अधिनियम कलम १८८ अंतर्गत अनधिकृत जाहिराती फ्लेक्स काढणेबाबत संबंधित व्यक्ती किंवा एजन्सींना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर बेकायदेशीर जाहिराती काढाव्या लागतात, असे ते म्हणाले.