बेंगळूर/प्रतिनिधी
गुरुवारी शहरातील ब्रुहत बेंगळूर महानगर पालीकेचे (बीबीएमपी) आयुक्त यांनी कर्नाटक प्रशासकीय सेवा (केएएस) मतदार संघ स्तरीय प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली. मुख्यमंत्री येडियुरपा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना परिस्थिती बाबत चांगलीच कानउघाडणी केली आहे. यांनतर बीबीएमपी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना त्याच्या जाबाबदाऱ्यांबाबत जाणीव करून दिली.
बीबीएमपी कमिशनर एन. मंजुनाथ प्रसाद यांनी, रुग्णांना हलविण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करणे, संपर्क ट्रेसिंग वाढवणे आणि कंटमेंट झोनमध्ये मार्गदर्शक सूचना लागू करणे अशा विविध विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा झाली केली.
यावेळी त्यांनी यापुढे अधिकाऱ्यांनी गृहविभागाचे नियम पाळावेत आणि कोविड पीडितांचे मृतदेह पटकन अंत्यसंस्कार करण्यासाठी किंवा दफन करण्यास सांगितले. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी त्या त्या ठिकाणी विभागीय नियंत्रण कक्ष आणि बूथ-स्तरीय पथके त्वरित तयार करण्यास सांगितली आहेत.