बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रूग्ण, त्यांची कुटुंबे, रुग्णालये आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय वाढविण्यासाठी ब्रुहत बेंगळूर महानगर पालीकेने (बीबीएमपी) खासगी रुग्णालयांना नागरिक सेवा डेस्क स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
बीबीएमपी कमिशनर एन. मंजुनाथा प्रसाद यांनी जारी केलेल्या आदेशानुसार कोरोना उपचारासाठी १०० खाटांवर उपचार केलेल्या सर्व खाजगी रुग्णालयांना हेच नियम लागू होईल. केंद्राच्या बेड वाटप प्रणालीच्या कामकाजासंदर्भात आणि बेडच्या उपलब्धतेबाबत सरकारला माहिती देण्याचे काम या डेस्कच्या माध्यमातून होईल.