बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे नऊ महिने बंद राहिलेली कर्नाटकातील सर्व वैद्यकीय आणि पॅरामेडिकल महाविद्यालये मंगळवारी पुन्हा सुरु झाली आहेत. यापार्श्वभूमीवर आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बेंगळूर मेडिकल कॉलेज आणि संशोधन संस्थेला भेट दिली. यावेळी मंत्री सुधाकर यांनी बीएमसीआरआय येथील विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान आज डेंटल, आयुष, पॅरामेडिकल, नर्सिंग आणि फार्मसी महाविद्यालयांनीही कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आजपासून नियमित वर्ग सुरू केले.