बेंगळूर
व्यवसायांसाठी लिजवर देण्यात आलेल्या बेंगळूर महानगरपालिकेच्या 324 मालमत्ता विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहेत. या मालमत्तांची किंमत 4,554 कोटी रुपये इतकी होते. लिजवर दिलेल्या मालमत्ता कंत्राटदारांना विक्री करून महसूल मिळविण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या बेंगळूर महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीने दिलेल्या सरकारी मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता मालमत्तांचे दर निश्चित करण्यात आले असून त्यांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. केवळ व्यावसायिक कारणासाठी दिलेल्या मालमत्ताच विक्रीला काढण्यात येणार आहेत. उर्वरित शैक्षणिक, सरकारी खात्यांसाठी व धार्मिक संस्थांना दिलेल्या मालमत्तांचा त्यात समावेश नाही.