बेंगळूर /प्रतिनिधी
बेंगळूरमधील दोन महिन्यांपासून बंद असणारी मेट्रो सेवा गेल्या दहा दिवसापासून सुरू झाली असून, मेट्रो सेवेच्या वाढीव वारंवारतेसह 1 जुलैपासून सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मेट्रो गाड्या चालवल्या जातील, असे बीएमआरसीएलने म्हंटले आहे.
बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) च्या माहितीनुसार, पीक तासात 5 मिनिटे आणि नॉन-पीक तासांमध्ये 15 मिनिटांच्या वारंवारतेने ही सेवा चालविली जाईल. तथापि, गाड्या केवळ आठवड्याच्या दिवसात (सोमवार ते शुक्रवार पर्यंत) कार्यरत राहतील. तसेच “शनिवारी आणि रविवारी कर्फ्यूमुळे कोणतीही सेवा सुरु असणार नाही, ” असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
बीएमआरसीएलने देखील अधिसूचित केले आहे की, तिकीट माध्यम म्हणून सध्या वापरल्या जाणार्या स्मार्ट कार्ड व्यतिरिक्त गुरुवारपासून एकल प्रवास करण्यासाठी स्मार्ट टोकन सुरू करण्यात येतील.