बेंगळूर /प्रतिनिधी
बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (बीएमआरसीएल) या आर्थिक वर्षात ५४.७७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तर गेल्या वर्षी २९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. अशी माहिती बीएमआरसीएलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.
बीएमआरसीएलने गुरुवारी म्हटले की, २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ३७६. ८८ कोटी रुपयांचा भाडे महसूल नोंदविला गेला होता, तर मागील वर्षीच्या ( ३५५.०२ कोटी ) तुलनेत चालू आर्थिक वर्षात कामकाजाच्या उत्पन्नात ६.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
परिणामी, बीएमआरसीएलने २२ मार्चपासून मेट्रो स्थगित केली असली तरी सन २०१९-२०२० साठी ५४.२० कोटी रुपये कार्यान्वित रोख रक्कम शिल्लक आहे. बीएमआरसीएलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बी.एल. यशवंत चव्हाण यांनी याविषयी माहिती दिली आहे.
बीएमआरसीएलने नोंदणी केलेल्या वर्षात १०८.९७ कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज समायोजित केल्यानंतर गतवर्षी २९ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता, त्या तुलनेत या आर्थिक वर्षात निव्वळ ५४.७७ कोटी तोटा झाला, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी बी.एल. यशवंत चव्हाण यांनी म्हंटले आहे.