बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये आजपासून तीन दिवस चालणाऱ्या ‘ऐरो इंडिया शो’ला सुरुवात झाली. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ऐरो इंडिया शो चे उदघाटन झाले
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज बेंगळूरच्या येळहंका येथील एरो इंडिया शोमध्ये आवर्जून उपस्थिती लावली. ऐरो इंडिया -२०२१ च्या उद्घाटनादरम्यान तीन एमआय -१७ हेलिकॉप्टरांनी उड्डाणामध्ये भाग घेतला. एरो इंडिया शो हा कार्यक्रम ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.