बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी बेंगळूर येथून रेमडेसिवीर इंजेक्शन्स वाढीव दराने विकल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्ती प्रति कुपी १० हजार रुपये किंमतीला विकत होते. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत त्या व्यक्तींना अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून रेमडेसिवीरच्या २५ कुपी ताब्यात घेतल्या.
डीसीपी बेंगळूर (पश्चिम) यांनी याविषयी माहिती देताना, बेंगळूरमध्ये प्रति कुपी १० हजार रुपये किंमतीला विकणाऱ्या तीन जणांना काल (मंगळवार) अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पंचवीस कुपी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.” कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता औषधाचा तुटवडा असताना राज्यात औषधांचा काळाबाजार सुरु असल्याचे उघड होत आहे.