बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर विद्यापीठाच्या आवारातील जंगलात आग लागली. ही आग इतकी वाढली की ती विद्यापीठाच्या आवारात पोहोचली. दरम्यान नागरी संरक्षण व अग्निशमन विभागाचे कर्मचारी ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.
कर्नाटकची राजधानी बेंगळूरमध्ये असणारे हे विद्यापीठ देशाच्या जुन्या विद्यापीठापैकी एक आहे. या विद्यापीठाची स्थापना १८८६ मध्ये झाली आहे.