बेंगळूर
कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजेन्स अधिकाऱयांनी देवनळ्ळीच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱया प्रवाशांकडून सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. विमानतळावर विदेशातून येणाऱया प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान, बेकायदेशीरपणे सोन्याची वाहतूक करणाऱया संशयितांना बेंगळूरच्या कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतले आहे. दिवसभरात एकूण तीनवेळा कारवाई करीत सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे.