बेंगळूर/प्रतिनिधी
जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांना गुरुवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान २७ जानेवारीला शशिकला यांची बेंगळूरच्या परप्पन अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे. शशिकला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरविण्यात आलं होतं. दरम्यान शशिकला यांना बुधवारी ताप आल्याने त्यांना बेंगळूर येथील बोअरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गुरुवारी त्यांच्या कुटुंबाच्या विनंतीनुसार शशिकला यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात हलविण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.