बेंगळूर/प्रतिनिधी
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चार वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहे. दरम्यान शशिकला यांनी शिक्षा कमी करावी आणि तुरूंगातून लवकर सुटका मिळावी अशी मागणी केली असल्याची अधिकृत माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.
बेंगळूरच्या परप्पन अग्रहरा तुरूंगात सलेल्या शशिकला यांना २७ जानेवारी २०२१ रोजी एका विशेष न्यायालयात दहा कोटी रुपये दंड जमा केल्यावर त्यांची सुटका होईल. मात्र, लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी तिने तुरुंगातील मुदत माफ करण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे, असे नेत्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.
तुरुंगातील अधिकाऱ्यांनी शशिकला यांचा अर्ज उच्च अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप काही माहिती दिलेली नाही.
शशिकला १५ फेब्रुवारी, २०१६ पासून तुरूंगात आहे. त्याचे दोन नातेवाईक देखील चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहेत. या तिघांनाही दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शशिकला यांना तुरुंगात ४३ महिने पूर्ण झाले आहेत आणि तुरूंगच्या नियमांनुसार, चांगल्या आचरणावर दरमहा तीन दिवसांची सूट दिली जाते. या आधारावर, त्यांना तुरूंगवासाच्या मुदतीत १३५ दिवसांची सवलत दिली जाऊ शकते.