बेंगळूर /प्रतिनिधी
बेंगळूरला बाहेरून येणाऱ्या बसमधून आणि वाहनांमधून ड्रग्स पुरविला जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बेंगळूर पोलिसांनी मंगळवारी रात्री पोलिस नारकोटिक्स डॉगचा वापर करून चौकात चौकात बस आणि वाहनांची अधिक तपासणी केली, असे सीसीबी पोलिसांनी सांगितले.
देशात ड्रग्स तस्करांचे जाळे मोठे असून विविध माध्यमातून ते शहरात ड्रग्सचा पुरवठा करत असतात. बेंगळूरमध्येही ड्रग्सचे मोठे जाळे आहे. याआधी बेंगळूर सीसीबी पोलिसांनी शहरात ड्रग आणि गांज्या विकणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मंगळवारी सीसीबी पोलिसांना बेंगळूरमध्ये वाहनातून ड्रग्सची तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वाहनांची तपासणी केली.
चित्रपट निर्माता इंद्रजित लंकेश याने फिल्म इंडस्ट्रीत ड्रग्स तस्करी होत असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून मंगळवारी इंद्रजित लंकेश यांची सीसीबी पोलिसांनी चौकशी केली. यावेळी त्यांनी ओळखीच्या १५ लोकांची नवे सांगितली आहेत, असं पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.