बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहर पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) बुधवारी शहरातील एक कोटी रुपयांच्या ड्रग्स पेडलिंग प्रकरणी चार जणांना अटक केली असल्याची माहिती दिली. याबाबत माहिती देताना सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी नवीन वर्षात वितरणासाठी आणलेल्या आणि साठवलेल्या १ कोटी रुपयांच्या मादक पदार्थांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
सीसीबीच्या पथकाने आरोपीची ओळख तिरुआपाला रेड्डी, कमलेश, अजज अहमद आणि सतीश कुमार अशी सांगितली आहे.