बेंगळूर/प्रतिनिधी
म्हैसूरमधील जेएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च लवकरच रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना लसीची क्लिनिकल मानवी चाचणी घेणार आहे.
हैदराबादस्थित डॉ. रेड्डीज प्रयोगशाळांना, ज्यांना भारतात स्पुटनिक व्ही. च्या क्लिनिकल चाचण्यांना मान्यता मिळाली होती, त्यांनी चाचण्यांसाठी जेएसएसएएचएआरची निवड केली होती. साइट तपासणी पूर्ण झाली असल्याने आतामानवी चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे. याबाबत मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच आम्ही चाचण्या सुरू करू, असे जेएसएसएएचएआरचे कुलगुरू सुरेश यांनी एका वृत्तपत्राला माहिती दिली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि फार्मास्युटिकल कंपनी अॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेली कोविशील्ड लसीची फेज २ आणि ३ टप्प्यात चाचण्या सुरू आहेत. जेएसएसएएचरची देखील अमेरिकेच्या बायोटेक्नॉलॉजी कंपनीने विकसित केलेली लस उमेदवार नोवावाक्सची एका आठवड्यात क्लिनिकल चाचणी सुरू होईल. आम्ही आठवड्यात नोव्हावाक्ससाठी फेज २ आणि ३ चाचणी सुरू करणार आहोत. वृद्ध लोकांमधील बीसीजी बूस्टर डोससाठी चालू असलेल्या चाचण्यांचा विचार केल्यास जेएसएसएएचआर एकाच वेळी चार मानवी चाचण्या घेईल, असे डॉ. सुरेश यांनी म्हंटले आहे.