बेंगळूर/प्रतिनिधी
बीबीएमपीचे प्रशासक श्री गौरव गुप्ता यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ता बांधकाम प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरात सुरु असणाऱ्या रस्ते बांधकाम कामांची पाहणी केली. टेंडरसुर मॉडेलमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या मध्यभागी असलेले ३६ रस्ते विकसित करण्यात आले आहेत.
दरम्यान राज भवन रोड, रेसकोर्स रोड, नेहरू प्लॅनेटेरियम रोड येथील कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जानेवारी २०१२१ मध्ये १० रस्ते कामांसह उर्वरित बांधकाम कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील. कंत्राटदाराकडून कामात दिरंगाई झाल्यास नोटीस बजावली जाईल आणि नियमांनुसार दंड आकारला जाईल, असे ते म्हणाले.