बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अन्य प्रमुख मान्यवर शनिवारी फील्ड मार्शल मानेकशा परेड मैदानावर स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये उपस्थित राहतील. या पार्शवभूमीवर बेंगळूर शहर पोलिस आयुक्त कमल पंत यांनी कडक सुरक्षा व्यवस्थेत हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे म्हंटले आहे.
कमलपंत यांनी 9 डीसीपी, 14 एसीपी, आणि 31 निरीक्षकांसह सुमारे 680 पोलिस कर्मचारी तैनात करणार असल्याचे सांगितले. तसेच गारूड कमांडो फोर्सचे एक युनिट, 10 केएसआरपी पलटण आणि 10 केएसआरपी बटालियन देखील सुरक्षा दलाच्या अतिरिक्त सुरक्षा उपायांव्यतिरिक्त कार्यक्रमस्थळी असतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.