बेंगळूर : बेंगळूरच्या डी. जे. हळ्ळी आणि के. जे. हळ्ळी येथील हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी सय्यद अब्बास (वय 38) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱयांनी अटक केली आहे. पुलकेशीनगरचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा निकटवर्तीय नवीन याने फेसबुकवर अपलोड केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे 11 ऑगस्ट 2020 रोजी बेंगळुरात हिंसाचार झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत 138 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारानंतर सय्यद अब्बास फरार झाला होता. तो एसडीपीआय संघटनेचा नागवार विभागाचा अध्यक्ष आहे. हिंसाचाराचा कट रचण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता, अशी माहिती एनआयएला मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी अनेक तपास पथके नेमण्यात आली होती. बुधवारी रात्री त्याला अटक करण्यात एनआयएला यश आले.
Previous Articleपोत्यातूनही उपलब्ध होणार वाळू
Next Article रोटरी क्लबतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.