बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे महसूलमंत्री आर अशोक यांनी, मंगळवारी रात्री डीजे हल्ली आणि केजी हल्ली भागातील हिंसाचारात एसडीपीआय सदस्य सामील असावेत असे म्हंटले आहे. मंगळवारी रात्री काँग्रेसचे आमदार श्रीनिवासमूर्ती यांच्या घरावर जमावाने हल्ला केला.
मंत्री अशोक यांनी आपण शांतता बाळगूया, आपली पोलीस यंत्रणा बळकट आहे. हिंसाग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हल्ल्यामागे एसडीपीआय सदस्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. सरकारही या दिशेने चौकशी करत आहे, असे त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.