बेंगळूर/प्रतिनिधी
सोशल मीडियावर एका पोस्टनंतर हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) नेते मुझमिल पाशाला अटक केली आहे. दरम्यान, बुधवारी डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी या भागात शांतता व परिस्थिती नियंत्रणात आहे. या भागात सीआरपीएफ आणि सीआयएसएफ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दीडशेहुन अधिक जणांना अटक केली आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी, घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. असे ते म्हणाले. येडियुरप्पा यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने सर्व शक्य पावले उचलली आहेत. पत्रकारांवर, पोलिसांवर आणि लोकांवर होणारा हल्ला निषेधार्ह आहे. सरकार अशा प्रकारच्या भडकवणार्या अफवा सहन करणार नाही. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. हिंसाचारग्रस्त भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.