बेंगळूर : बेंगळूरच्या के. जे. हळ्ळी आणि डी. जे हळ्ळी येथील हिंसाचार प्रकरणातील 18 संशयित आरोपींना एनआयएन विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दर्शविला आहे. कायद्याचे उल्लंघन करण्याबरोबर समाजविघातक कृत्यामध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून न्या. कसनपपा नायक यांनी आरोपींची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. सय्यद खलिद, मुदासीर अहमद, सय्यद मुबारक उर्फ डिच्ची मुबारक यांच्यासह 18 जणांनी जामीन मिळविण्यासाठी एनआयए विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी बाजू मांडताना आपल्या पक्षाचे अर्जदार कोणत्याही दहशतवादी संघटनेचे सदस्य नाहीत. पोलिसांनी योग्य तपास न करता दोषारोपत्र दाखल केला आहे, असे सांगितले. मात्र, न्यायालयाने बेंगळूरमधील दंगलीमागे मोठे कारस्थान आहे. आरोपींकडून मोठी फितुरी झाली आहे. त्यामुळे जामीन देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
Previous Articleसांगे, केपे, मुरगावात भाजप : मडगावात युती
Next Article राज्यात सोमवारी 29 हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.