बेंगळूर/प्रतिनिधी
पूर्व बेंगळूर येथे मंगळवारी रात्री पोलिसांच्या गोळीबारात तीन तरुण ठार झाले आहेत. सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट मुळे हिंसा झाल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. यावेळी जमावाने पोलीस स्टेशन आणि काँग्रेस आमदाराच्या घराला लक्ष्य केले. जमावाने पोलीस स्टेशन आणि काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एसडीपीआयच्या नेत्यांसह वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या आमदाराच्या नातेवाईकावर कारवाई केली आहे.
पोलिसांनी आमदारांच्या नातेवाईकासह 145 जणांना अटक केली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हंटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी, सरकार या घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार आहे. असे म्हंटले आहे.