बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी माजी महापौर आर संपत राज यांना सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेच्या पुष्टीनंतर काही तासांनी मंगळवारी शहरातील केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) मुख्यालयात त्यांना चौकशीसाठी घेऊन गेले.
या प्रकरणाची चौकशी पथकामार्फत राज यांची चौकशी केली जात आहे, तर गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी अटक केल्याची अधिक माहिती सामायिक केली जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) मुख्यालयात गेल्या दोन तासांपासून माजी महापौर संपत राज यांची चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त हे संदीप पाटील मुख्यालयात असून त्यांच्या समोर ही चौकशी केली जात आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला शहरातील रुग्णालयातून बेपत्ता झाल्यावर राज यांना पोलिसांनी फरार घोषित केले होते. परंतु आपण कोरोनावर उपचार घेत असल्याचा दावा त्यांनी केला होता.