बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचार प्रकरणी नगरसेवक अब्दुल रकीब झाकीर यांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने (सीसीबी) अटक केली होती.
अटकेची पुष्टी करतांना सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी “डीजे हळ्ळी प्रकरणातील आरोपी झाकीर याला काल बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी माजी महापौर आर संपत राज यांना अटक झाल्यानंतर पंधरवड्यात अटक करण्यात आली आहे.
पुलकेशनगर प्रभागाचे माजी नगरसेवक झाकीर यांचे नाव १२ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या अंतरिम आरोपपत्रात आरोपी म्हणून ठेवले गेले होते. आरोपपत्रानुसार ११ ऑगस्ट रोजी पुलिकेनगरनगरचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या कावळ बायरसंद्रा येथील घर जाळण्याच्या कारस्थानात झाकीर सहभागी होते.