बेंगळूर : ऑगस्ट 2020 मध्ये बेंगळूरच्या के. जे. हळ्ळी व डी. जे. हळ्ळी येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणातील 115 संशयित आरोपींना उच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. हिंसाचार प्रकरणाचा एनआयएकडून तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना एनआयए विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विश्वजित शेट्टी यांच्या एकसदस्यिय खंडपीठाने एनआयए न्यायालयाचा आदेश रद्द करत 155 संशयितांना जामीन मंजूर केला आहे. दोघांचे हमीपत्र आणि 1 लाख रुपयांचा वैयक्तिक बॉड सादर करण्याची सूचना न्यायालयाने आरोपींना दिली आहे.
Previous Articleसंभाव्य पूरस्थितीसंदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक
Next Article राज्यात 5,783 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.