बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण पश्चिम रेल्वेने जनतेच्या मागणीला उत्तर देताना यशवंतपूरहून हावडाकडे जाणारी विशेष रेल्वे शनिवारी (१२ सप्टेंबर) पासून सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
ट्रेन (क्र. ०६५०५) यशवंतपूरहून ११ वाजता सुटणार असून दुसर्या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता पश्चिम बंगालच्या हावडा येथे पोहचणार आहे . एसडब्ल्यूआरच्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे मार्गावर रेल्वेच्या रेनिगुंटा, विजयवाडा, विजयानगर आणि भुवनेश्वर येथे थांबेल.
या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणी एसी कोच, २-स्तरीय एसी कोच, सहा ३-स्तरीय एसी कोच आणि 11 द्वितीय श्रेणीचे स्लीपर कोच असतील.
दरम्यान, रेल्वे क्रमांक (०२२४५) हावडा – यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल सेवा १२ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू केल्या जातील. पश्चिम बंगालमध्ये टाळेबंदीमुळे ही गाडी रद्द करण्यात आली होती. एसडब्ल्यूआर अधिकाऱ्यांनी याविषयाची पुष्टी केली असून ठरलेल्या मार्गावर आणि वेळेनुसार ही ट्रेन धावणार असल्याचे म्हंटले आहे.